भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाशिवंतासाठीं करितोसी आटी । दृढ धरा कंठीं एक नाम

nashivantasathin karitosi ati | drudh dhara kanthin ek nam

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
नाशिवंतासाठीं करितोसी आटी । दृढ धरा कंठीं एक नाम ॥१॥ भवासी तारक विठ्ठलची एक । नाहीं आणिक सुख येतां जातां ॥२॥ एक एक योनी कोटी कोटी फेरा । नरदेहीं थारा तईच लाभे ॥३॥ चोखा म्हणे येथें एकचि साधन । संतासी शरण जाईं सुखें ॥४॥