भजनी मालिका
← भजनांकडे परत

अहो पतित पावना पंढरीच्या राया । भक्त विसाविया मायबापा

aho patit pavana pandharichya raya | bhakta visaviya mayabapa

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
अहो पतित पावना पंढरीच्या राया । भक्त विसाविया मायबापा ॥१॥ धांवे दुडदुडा आपुलिया काजा । येई गरुडध्वजा मायबापा ॥२॥ दाही दिशा उदास तुम्हांविण झाल्या । न करीं पांगिला दुजीयासी ॥३॥ चोखा म्हणे मज दावीं आतां वाट । मग मी बोभाट न करी कांही ॥४॥