भजनी मालिका
← भजनांकडे परत

अहो करुणाकरा रुक्मिणीच्या वरा । उदारा धीरा पांडुरंगा

aho karunakara rukminichya vara | udara dhira panduranga

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
अहो करुणाकरा रुक्मिणीच्या वरा । उदारा धीरा पांडुरंगा ॥१॥ काय म्यां पामरें वानावें जाणावें । न कळे कैसें गावें नाम तुमचें ॥२॥ विध अविध कोणता प्रकार । न नेणों कळे साचार मजलागीं ॥३॥ चोखा म्हणे मज कांहींच न कळे । उगाचि मी लोळे महाद्वारीं ॥४॥