भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनाम जयासी तेचं रूपा आलें । उभें तें राहिलें विटेवरी

anam jayasi techan rupa alen | ubhen ten rahilen vitevari

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
अनाम जयासी तेचं रूपा आलें । उभें तें राहिलें विटेवरी ॥१॥ पुंडलिकाच्या प्रेमा युगे अठ्ठावीस । समचरणी वास पंढरीये ॥२॥ चोखा म्हणे ऐसा भक्तांचा कनवाळू । जाणे लळा पाळू भाविकांचा ॥३॥