भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघी पंढरी भुवैकुंठ नगरी । नांदतसे हरी सर्वकाळ

avaghi pandhari bhuvaikunth nagari | nandatase hari sarvakal

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
अवघी पंढरी भुवैकुंठ नगरी । नांदतसे हरी सर्वकाळ ॥१॥ चतुर्भुज मूर्ति शंख चक्र करीं । पीतांबरधारी श्यामवर्ण ॥२॥ श्रीमुख शोभलें किरीट कुंडलें । तेंचि मिरवले चंद्र सूर्य ॥३॥ पितांबरी कांसे सोनसळा विराजे । सर्वांगी साजे चंदनउटी ॥४॥ मिरवलें कर दोनीं कटावरी । ध्यान ते त्रिपुरारि ध्यात असे ॥५॥ सनकादिक भक्त पुंडलिक मुनी । सुखसमाधानी सर्वकाळ ॥६॥ आनंदाचा कंद उभा विटेवरी । चोखा परोपरी नाचतसे ॥७॥