भजनी मालिका
← भजनांकडे परत

असेंच करणें होतें तुला । तरी का जन्म दिला मला

asench karanen hoten tula | tari ka janma dila mala

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
असेंच करणें होतें तुला । तरी का जन्म दिला मला ॥१॥ जन्म देवोनी सांडिलें । कांहो निष्ठुर मन केलें ॥२॥ कोठें गेला माझे वेळीं । केलें कोणाचें सांभाळी ॥३॥ चोखा म्हणे देवा । नको मोकलूं केशवा ॥४॥