भजनी मालिका
← भजनांकडे परत

अखंड समाधी होउनी ठेलं मन । गेलें देहभान विसरोनी

akhand samadhi houni thelan man | gelen dehabhan visaroni

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
अखंड समाधी होउनी ठेलं मन । गेलें देहभान विसरोनी ॥१॥ विधिनिषेध भेणें न मोडे समाधी । तुटली उपाधी लिगाडाची ॥२॥ चालतां बोलतां न मोडे समाधी । मूळ अंतरशुद्धी कारण हें ॥३॥ चोखा म्हणे ऐसा समाधी सोहळा । जाणे तो विरळा लक्षामाजीं ॥४॥