भजनी मालिका
← भजनांकडे परत

असोनि नसणें या नांव स्वार्थ । येथेंचि परमार्थ सुखी होय

asoni nasanen ya nanv svartha | yethenchi paramartha sukhi hoy

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
असोनि नसणें या नांव स्वार्थ । येथेंचि परमार्थ सुखी होय ॥१॥ स्वार्थ परमार्थ आपुलेची देहीं । अनुभवोनि पाहीं तुझा तूंची ॥२॥ सुख दु:ख दोन्ही वाहूं नको ओझें । मी आणि माझें परतें सारीं ॥३॥ चोखा म्हणे तोचि योगियांचा राणा । जिहीं या खुणा अनुभविल्या ॥४॥