भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघा आनंद राम परमानंद । हाचि लागो छंद माझे जीवा

avagha anand ram paramanand | hachi lago chhand majhe jiva

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
अवघा आनंद राम परमानंद । हाचि लागो छंद माझे जीवा ॥१॥ हेंचि साधन निकें जगासी उद्धार । आणिक साचार दुजें नाहीं ॥२॥ क्रोधांचे न पडतां आघात । वाचे गातां गीत राम नाम ॥३॥ चोखा म्हणे ऐसा भरंवसा नामाचा । जेथें कळिकाळांचा रीघ नाहीं ॥४॥