भजनी मालिका

भजने

सांगेन तें हित धरा अवघें मनीं । नका मन कोणी वीट याचा ॥१॥ बरें शिकवितां बरें तें माना वाईटा त्यागावें त्यागवितां ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

सांगेल खूण परि हें न कळे । नुघडतां डोळे बुध्दीचे ॥१॥ याचिलागीं चित्तशुध्दी । करा हो उपाधी निरसुनी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

सांगो जातां शब्दचि विरे । जेंवि अंधारें रविभेटीं ॥१॥ सागरीं ठाव बुडीही देतां । न लभेची सर्वथा निर्बुजला ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

सांगो नवरसलक्षण । तरी शृंगार हास्य करुण । धीर वीर भयानक जाण । बीभत्स अदभुत शांतरस ॥१॥ शृंगारिक तें माधुर्य गाणें । हास्य तें विनोदकरणें । कारुण्‍य तें कींव भाकणें । धैर्य उपजवणें तें धीर ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

साच जें होतें तें दिसोनियां आलें । आतां मी न बोले तुम्हां कांहीं ॥१॥ तुमचें उचित तुम्हींच करावें । आम्हीं सुखें पाहावें होय तैसें ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

साच मज काय कळों नये देवा । काय तुझी सेवा काहे नव्हे ॥१॥ करावें तें बरें जेणें समाधान । सेवावें हें वन न बोलावें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

साच माझा देव्हारा । भाक ठेवा भाव खरा । त्रिगुणाचा फुलवरा । आणा विनंति सांगतों ॥१॥ माझें दैवत हें रंगीं । नाचे वैष्णवांच्या संगीं । भरलें मग अंगीं । निवाड करी दोहींचा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

साच हा विठ्ठल साच हें करणें । संत जें वचनें बोलियेले ॥१॥ साच तें स्वहित साच ते प्रचित । साच वेद नीत सांगतील ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

साचपणें देवा शरण पैं जाती । तया वैकुंठपती विसरेना ॥१॥ जैसी कन्या दुरदेशीं एकटी । रात्रंदिवस संकटीं घोकी मायबाप ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

साचपणें ब्रीद सोडनिन तुझ्या । आतां केशिराजा पण हाचि ॥१॥ लबाड तूं देवा लबाड तूं देवा । लबाड तूं देवा ठावा आम्हां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

साचपणें माझें करावें धांवणें । काया वाचा मनें शरण तुम्हां ॥१॥ अहो पंढरीया नका आतां दुजें । विश्रांती सहज तवचरणीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

साजिरें सुंदर श्रीमुख पाहतां । नाठवे ती चिंता संसाराची ॥१॥ तो हा पाडुरंग विटेवरी उभा । त्रैलोक्याचा गाभा शोभतसे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ