भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांजे ओसरतां सांत

sanje osaratan sant

रचनाकार: संत रामदास · अभंग
सांजे ओसरतां सांत । वांया करावा आकांत तैसीं सखीं जिवलगें । जाती एकमेकांमागें चारी दिवस यात्रा भरे । सवेंचि मागुति ओसरे पूर्ण होतां महोत्साव । फुटे अवघा समुदाव बहू वह्राडी मिळाले । जैसे आले तैसै गेले एक येती एक जाती । नाना कौतुक पाहती रामीरामदास म्हणे । संसारासी येणे जाणे।