भजनी मालिका
← भजनांकडे परत

साचपणें देवा शरण पैं जाती । तया वैकुंठपती विसरेना

sachapanen deva sharan pain jati | taya vaikunthapati visarena

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
साचपणें देवा शरण पैं जाती । तया वैकुंठपती विसरेना ॥१॥ जैसी कन्या दुरदेशीं एकटी । रात्रंदिवस संकटीं घोकी मायबाप ॥२॥ पतिव्रतेचें सर्व मन पतिपायीं । तैसा देव ठायीं तिष्ठतसे ॥३॥ एका जनार्दनीं मज हा अनुभव । जनार्दनें देव दाखविला ॥४॥