भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांगो जातां न कळे वाचा । महिमा कथेचा अपार

sango jatan na kale vacha | mahima kathecha apar

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सांगो जातां न कळे वाचा । महिमा कथेचा अपार ॥१॥ श्रवणें पठणें हरिची कीर्ती । नाना याति उध्दारल्या ॥२॥ चतुष्पदें श्वानसूकरें । श्रवणवदारें मुक्ति त्यां ॥३॥ निळा म्हणे कीटक पक्षां । कीर्तनें वृक्षा हरिप्राप्ती ॥४॥