भजनी मालिका
← भजनांकडे परत

साजिरें सुंदर श्रीमुख पाहतां । नाठवे ती चिंता संसाराची

sajiren sundar shrimukh pahatan | nathave ti chinta sansarachi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
साजिरें सुंदर श्रीमुख पाहतां । नाठवे ती चिंता संसाराची ॥१॥ तो हा पाडुरंग विटेवरी उभा । त्रैलोक्याचा गाभा शोभतसे ॥२॥ एका जनार्दनीं कर ठेवुनी कटीं । उभा वाळूवटीं चंद्रभागे ॥३॥