भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांगो नवरसलक्षण । तरी शृंगार हास्य करुण । धीर वीर भयानक जाण । बीभत्स अदभुत शांतरस

sango navarasalakshan | tari shrungar hasya karun | dhir vir bhayanak jan | bibhatsa adabhut shantaras

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सांगो नवरसलक्षण । तरी शृंगार हास्य करुण । धीर वीर भयानक जाण । बीभत्स अदभुत शांतरस ॥१॥ शृंगारिक तें माधुर्य गाणें । हास्य तें विनोदकरणें । कारुण्‍य तें कींव भाकणें । धैर्य उपजवणें तें धीर ॥२॥ वीर ते युध्दाच्या गांठीं । शब्दामागें शब्द उठी । भयानक रसा भय घाली पोटीं । बीभत्स त्याहुनी कुष्टी उच्छुंखल ॥३॥ अदभुत रस ते नवलवाणें । जे का अचाटचि बोलणें । श्रोतयातें विस्मय देणें । ऐकतां शहाणे निर्बुजती ॥४॥ शांतरस तो शुध्द सात्विक । विकारविवर्जित माजीं विवके । निळा म्हणे हे नवरस देख । जाणति गायक चतुर ते ॥५॥