भजनी मालिका
← भजनांकडे परत

साच जें होतें तें दिसोनियां आलें । आतां मी न बोले तुम्हां कांहीं

sach jen hoten ten disoniyan alen | atan mi na bole tumhan kanhin

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
साच जें होतें तें दिसोनियां आलें । आतां मी न बोले तुम्हां कांहीं ॥१॥ तुमचें उचित तुम्हींच करावें । आम्हीं सुखें पाहावें होय तैसें ॥२॥ विपरीत सुपरीत तुमचीय़े घरीं । तुमची तुम्हां थोरी बरी दिसे ॥३॥ चोखा म्हणे ऐसा हा नवलाव । न कळेचि भाव ब्रम्हादिका ॥४॥