भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांगों काय नेणा देवा । बोलाची त्या आवडी

sangon kay nena deva | bolachi tya avadi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सांगों काय नेणा देवा । बोलाची त्या आवडी ॥१॥ वांयां मज चुकुर करा । विश्वंभरा विनोदें ॥ध्रु.॥ आवडीच्या करा ऐसें। अंतर्वासें जाणतसां ॥२॥ तुका म्हणे समाधानें । होइन मनें मोकळा ॥३॥