भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतांच्या धीक्कारें अमंगळ जिणें । विश्वशत्रु तेणें सांडी परि

santanchya dhikkaren amangal jinen | vishvashatru tenen sandi pari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
संतांच्या धीक्कारें अमंगळ जिणें । विश्वशत्रु तेणें सांडी परि ॥१॥ कुळ आणि रूप वांयां संवसार । गेला भरतार मोकलितां ॥ध्रु.॥ मूळ राखे तया फळा काय उणें । चतुर लक्षणें राखों जाणे ॥२॥ तुका म्हणे सायास तो एके ठायीं । दीप हातीं तई अवघें बरें ॥३॥