भजनी मालिका
← भजनांकडे परत

संताचे संगती मनोमार्गगती

santache sangati manomargagati

संताचे संगती मनोमार्गगती । आकळावा श्रीपती येणें पंथे ॥१॥ राकृष्ण वाचा भाव हा जिवाचा । आत्मा जो शिवाचा रामजप ॥२॥ एकतत्त्वनाम साधिती साधन । द्वैताचें बंधन न बाधिजे ॥३॥ नामामृत गोडी वैष्णवां लाधली । योगियां साधली जीवनकळा ॥४॥ सत्त्वर उच्चार प्रल्हादीं बिंबला । उध्दवा लाधला कृष्णदाता ॥५॥ ज्ञानदेव म्हणे नाम हें सुलभ । सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ॥६॥