भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतांचे ठायीं नाहीं द्वैतभाव । रंक आणि राव सारिखाची

santanche thayin nahin dvaitabhav | rank ani rav sarikhachi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संतांचे ठायीं नाहीं द्वैतभाव । रंक आणि राव सारिखाची ॥१॥ संताचें देणें अरिमित्रां सम । कैवल्यांचें धाम उघड तें ॥२॥ संतांची थोरीव वैभव गौरव । न कळे अभिप्राय देवासी तो ॥३॥ एका जनार्दनीं करी संतसेवा । परब्रह्मा ठेवा प्राप्त जाला ॥४॥