भजनी मालिका
← भजनांकडे परत

शरीर हें जायाचें नश्वर आणिकांचें । म्हणाल जरी त्याचें काय काज

sharir hen jayachen nashvar anikanchen | mhanal jari tyachen kay kaj

रचनाकार: संत नामदेव · अभंग
शरीर हें जायाचें नश्वर आणिकांचें । म्हणाल जरी त्याचें काय काज ॥१॥ आंबरसें चोखिला बिजसालें सांडिला । पुढें तेणें उभविला दुजा एकू ॥२॥ समूळ साल माया सांडुनियां दिजे । परि अहंबीज जतन करा ॥३॥ तें बीज भाजोनि करा ओंवाळणी । संतांचे चरणीं समूळ देह ॥४॥ पुढें त्या बीजांची न करावी दुराशा । न धरावी आशा पुढिलंची ॥५॥ आहे नाहीं देह धरीं ऐसा भाव । म्हणे जनी देव सहज होसी ॥६॥