भजनी मालिका
← भजनांकडे परत

शरीर हें स्थळ मळानिर्मळाचें मूळ । पाहोनि चोखाळ आदिपुरुषासी

sharir hen sthal malanirmalachen mul | pahoni chokhal adipurushasi

शरीर हें स्थळ मळानिर्मळाचें मूळ । पाहोनि चोखाळ आदिपुरुषासी । जन्म मरणाचिया उचलुनि पेडी । मग तया बिंबडीं ज्ञान पिके ॥१॥ पंढरिचें पिक नसमाये अंबरीं । तें शेत सोकरी पुंडलिक ॥ध्रु०॥ ऐहिक परत्र दोन्ही शेताचीं आउतें । मुंड मुंड तेथें कुळवाडिये । उचलुनि पेंडी कासिया समुळीं । मग पुण्यकाळीं वोलवले ॥२॥ गरुडटके दोन्ही शेताची बुझवणी । दस कुडपणी नामघोष । एकवीस स्वर्गाचा घालुनिया माळा । मग तया गोपाळामजीं खेळे ॥३॥ जये शेतीं निवृत्ती भीतरे तये शेतीं साजे पुरे । राउळीं निदसुरे दंडीजती ॥ रात्रंदिवस तुम्हीं हरिचरणीं जागा । तेणें तरालगा भगसागरु ॥४॥ अठाराही बलौतें तें केलें धडौतें । खळें दान देतें सनकादिका । ज्ञानदेव म्हणे जगदानीं पिकला । पुरोनि उरला पंढरिये ॥५॥