भजनी मालिका
← भजनांकडे परत

शांति क्षमा दया सर्वभावें करुणा

shanti kshama daya sarvabhaven karuna

शांति क्षमा दया सर्वभावें करुणा । तोचि नारायणा आवडे दासु ॥ १ ॥ तोचि एक साधु बोलिजे पैं जनीं । निरंतर ध्यानीं कृष्णमूर्ति ॥ २ ॥ जीवशिव एक सर्वत्र चैतन्य । ऐसे जया कारुण्य तोचि धन्य ॥ ३ ॥ तोचि एक भक्तु हरि हरि म्हणे । नित्य नारायणें तारिजे त्यासि ॥ ४ ॥ येउनि जनीं सदा पैं तो विदेही । तारकू सबाहीं सप्रेमळु ॥ ५ ॥ निवृत्ति सांगतु भक्तीचा महिमा । करी शांति क्षमा तो विरळा असे ॥ ६ ॥