भजनी मालिका
← भजनांकडे परत

शब्दामृत मांडे येती भोजना । अभ्यासी अज्ञाना तरी फळें

shabdamrut mande yeti bhojana | abhyasi adnyana tari phalen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
शब्दामृत मांडे येती भोजना । अभ्यासी अज्ञाना तरी फळें ॥१॥ मुंगीचे थडके फुटे जों आकाश । ब्रह्मत्वेम सायास नये हातीं ॥२॥ मशका ओढी मेरू हाले बुडीं । जीवाचे ते जोडी ब्रह्म मिळे ॥३॥ उदकीं जरी मासोळी सूर्यासी भेटे । वारियाचे कोठें दृष्टि पडे ॥४॥ चंद्राचें चांदणें घेती जे पालवी । मिथ्या माया देवी नामा म्हणे ॥५॥