भजनी मालिका
← भजनांकडे परत

शब्द ज्ञानी येऊं नेदीं दृष्टीपुढें । छळवादी कुडे अभक्तते

shabda dnyani yeun nedin drushtipudhen | chhalavadi kude abhaktate

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
शब्द ज्ञानी येऊं नेदीं दृष्टीपुढें । छळवादी कुडे अभक्तते ॥१॥ जळो ते जाणींव जळो त्याचे बंड । जळो तया तोंड दुर्जनाचें ॥२॥ तुका म्हणे येती दाटूनि छळाया । त्यांच्या बोडूं डोया न धरूं भीड ॥३॥