भजनी मालिका
← भजनांकडे परत

शब्दांचीं रत्नें करूनी अळंकार । तेणें विश्वंभर पूजियेला

shabdanchin ratnen karuni alankar | tenen vishvambhar pujiyela

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
शब्दांचीं रत्नें करूनी अळंकार । तेणें विश्वंभर पूजियेला ॥१॥ भावाचे उपचार करूनि भोजन । तेणें नारायण जेवविला ॥ध्रु.॥ संसारा हातीं दिलें आंचवण । मुखशुद्धी मन समर्पिलें ॥२॥ रंगलीं इंद्रियें सुरंग तांबूल । माथां तुळसीदळ समर्पिलें ॥३॥ एकभावदीप करूनि निरांजन । देऊनि आसन देहाचें या ॥४॥ न बोलोनि तुका करी चरणसेवा । निजविलें देवा माजघरीं ॥५॥