भजनी मालिका
← भजनांकडे परत

शब्दाचें सुख श्रवणाचेनि द्वारें । माझिया दातारें ऐसें केलें

shabdachen sukh shravanacheni dvaren | majhiya dataren aisen kelen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
शब्दाचें सुख श्रवणाचेनि द्वारें । माझिया दातारें ऐसें केलें ॥१॥ स्पर्शाचें सुख त्वचेचेनि द्वारे । माझिया दातारें ऐसें केलें ॥२॥ रूपाचें सुख नेत्राचेनि द्वारें । माझिया दातारें ऐसें केलें ॥३॥ रसाचें तें सुख रसनेचेनि द्वारें । माझिया दातारें ऐसें केलें ॥४॥ गधाचें सुख नाकाचेनि द्वारें । माझिया दातारें ऐसें केलें ॥५॥ नामा म्हणे ऐसे जयाचे उपकार । तयासी गव्हार विसरले ॥६॥