भजनी मालिका
← भजनांकडे परत

शय्याशयन आणि शेजार । तें अवघेंचि जालें शरीर

shayyashayan ani shejar | ten avaghenchi jalen sharir

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
शय्याशयन आणि शेजार । तें अवघेंचि जालें शरीर ॥१॥ कैसें नीज घेतसे निजे । नीज देखोनी समाधी लाजे ॥२॥ जागृती जागे निजे । स्वप्न सुषुप्तीचे निजगुंजें ॥३॥ एका जनार्दनीं निजला । तो नीजचि होउनी ठेला ॥४॥