भजनी मालिका
← भजनांकडे परत

वीतभर पोट लागलेंसे पाठी । साधुसंगें गोष्टी सांगूं न देई

vitabhar pot lagalense pathi | sadhusangen goshti sangun na dei

रचनाकार: संत नामदेव · अभंग
वीतभर पोट लागलेंसे पाठी । साधुसंगें गोष्टी सांगूं न देई ॥१॥ पोट माझी माता पोट माझा पिता । पोटानें ही चिंता लाविलीसे ॥२॥ पोट माझा बंधु पोट माझी बहीण । पोटानें हें दैन्य मांडिलेंसे ॥३॥ विष्णुदास नामा पोटाकडे पाहे । अजून किती ठाये हिंडविसी ॥४॥