भजनी मालिका
← भजनांकडे परत

विष्णूचें सेवन जये गांवीं पूजा । नित्य तया द्विजा समारंभु

vishnuchen sevan jaye ganvin puja | nitya taya dvija samarambhu

रचनाकार: संत नामदेव · अभंग
विष्णूचें सेवन जये गांवीं पूजा । नित्य तया द्विजा समारंभु ॥१॥ घरीं वृंदावन नित्य अन्नदान । श्रीकृष्ण आपण तेथें असे ॥२॥ ऐसी ध्यानगती विष्णूचें पूजन । तयासि पतन नाहीं नाहीं ॥३॥ नाम म्हणे करा विष्णुकथा नित्य । रामनाम सत्य वचन धरा ॥४॥