भजनी मालिका
← भजनांकडे परत

वीट नेघे ऐसें रांधा । जेणें बाधा उपजे ना

vit neghe aisen randha | jenen badha upaje na

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वीट नेघे ऐसें रांधा । जेणें बाधा उपजे ना ॥१॥ तरीच तें गोड राहे । निरें पाहे स्वयंभ ॥ध्रु.॥ आणिकां गुणां पोटीं वाव । दावी भाव आपुला ॥२॥ तुका म्हणे शुद्ध जाती । ते मागुती परतेना ॥३॥