भजनी मालिका
← भजनांकडे परत

विश्रामीचा श्रम आश्रम पैं नेम

vishramicha shram ashram pain nem

विश्रामीचा श्रम आश्रम पैं नेम । जप हा परम आत्मलिंगीं ॥ १ ॥ निवृत्ति घन दाट कृष्णरूपें आम्हा । अखंड पूर्णिमा नंदाघरीं ॥ २ ॥ निवृत्तिचित्ताची गेली लगबग । केला अनुराग कृष्णरूपीं ॥ ३ ॥ निवृत्ति धारणा कृष्णनाम सार । सर्वत्र आचार हरिहरि ॥ ४ ॥