भजनी मालिका
← भजनांकडे परत

विश्रामधर्मता आश्रमपूर्णता

vishramadharmata ashramapurnata

विश्रामधर्मता आश्रमपूर्णता । आपरूप कथा निमे जेथें ॥ १ ॥ तें हें कृष्णबाळ गोपिकांसि खेळे । नंदाघरीं सोहळें आनंदाचे ॥ २ ॥ कथा त्या कथितां पूर्ण त्या मथिता । अरूप अच्युता सर्व असे ॥ ३ ॥ निवृत्ति समाधान कृष्ण हें चोखडें । मनोनिग्रह खोड चरणीं गोवी ॥ ४ ॥