भजनी मालिका
← भजनांकडे परत

२५२ : विवेकाची पेठ । उघडी पंढरीची वाट

252 : vivekachi peth | ughadi pandharichi vat

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
२५२ : विवेकाची पेठ । उघडी पंढरीची वाट ।।१।। तेथें नाहीं कांहीं धोका उठाउठी भेटे सखा ॥२॥ मरोनियां जावें। शरण विठोबासी व्हावें ॥३॥ म्हणे नामयाची जनी देव करा ऐसा ऋणी ॥४॥