भजनी मालिका
← भजनांकडे परत

विश्वंभरमूर्ति विश्वाचे पाळक

vishvambharamurti vishvache palak

विश्वंभरमूर्ति विश्वाचे पाळक । वैकुंठव्यापक जीवशिव ॥ १ ॥ तें रूप सुंदर नंदाघरीं वसे । जनीवनीं वसे कृष्णरूप ॥ २ ॥ निखळ निघोट नितंब परिपूर्ण । आनंदपुर्णघन गोपवेषें ॥ ३ ॥ निवृत्ति परिकर वैकुंठ अपार । भाग्य पारावार यशोदेचें ॥ ४ ॥