भजनी मालिका

भजने

आधींच कृपाळू भोळा महादेव । जाणितला भाव कुरंगांचा ॥१॥ कृपा केली देवें मांडिला सन्मान । धाडिलें विमान दूताहातीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आधींच मी लटिका वरी लटिकी तुझी माया । ऐसें हें कासया पाहसी देवा ॥१॥ जाणतां नेणतां नाम तुझें देवा । गाईन केशवा आवडीनें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आन साधनें सायास । कांहीं न करीं आयास नामाचाचि उल्हास । ह्रदयीं वास असावा ॥१॥ हेचि मागतसे देवा । हीच माझी भोळी सेवा । पायांसी केशवा । हाचि हेवा मानसीं ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

आनंताचे गुण अनंत अपार । न कळेचि पारश्रुतीशास्त्रीं ॥१॥ तो हा महाराज विटेवरी उभा लावण्याचा गाभा शोभतसे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ते हे समचरण साजिरे विटेवरी । पहा भीमा तिरी विठ्ठलरुप ॥धृ॥

रचनाकार: संत तुकाराम

आनंद अद्वय नित्य निरामय । सावळा भासताहे मजलागीं ॥१॥ वेधु तयाचा माझिया जीवा । काया वाचा मनोभावा लागलासे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आनंद झाला अयोध्येसी आले रघुनाथ । अवघा जयजयकार आळंगिला भरत ॥१॥ आनंदले लोक नरनारी परिवार । शंखभेरीतुरें वाद्यांचे गजर ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आनंद समाधि संत भक्त देव । करिती उत्साह संवत्सरीं ॥१॥ गरुड हनुमंत भक्त ते मिळाले । जयजयकार केलें सुरवरीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आनंद सोहळा वृंदावनीं पाहों । नंदजीचा कृष्ण तेणें केला नवलावो ॥१॥ धाकुले संवंगडे गौलणींचा थाट । वेणु पावां वाजविती नाचती दाट ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आनंदाचा कंद उभा पाडुरंग । गोपाळांचा संघ भोवतां उभा ॥१॥ चंद्रभागा तीरीं शोभे पुंडलीक । संत अलोकिक गर्जताती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आनदाचा भोग घालीन आसनीं । वैकुंठनिवासनी तुझेंनावें ॥१॥ येई वो विठ्ठले अनाथाचे नाथे । पंढरी दैवते कुळदेवी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ