भजनी मालिका
← भजनांकडे परत

आनदाचा भोग घालीन आसनीं । वैकुंठनिवासनी तुझेंनावें

anadacha bhog ghalin asanin | vaikunthanivasani tujhennaven

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आनदाचा भोग घालीन आसनीं । वैकुंठनिवासनी तुझेंनावें ॥१॥ येई वो विठ्ठले अनाथाचे नाथे । पंढरी दैवते कुळदेवी ॥२॥ आपुलें म्हणावें सनाथ करावें । एका जानर्दना वंदावें संतजना ॥३॥