भजनी मालिका
← भजनांकडे परत

आनंदाचा कंद उभा पाडुरंग । गोपाळांचा संघ भोवतां उभा

anandacha kand ubha padurang | gopalancha sangh bhovatan ubha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आनंदाचा कंद उभा पाडुरंग । गोपाळांचा संघ भोवतां उभा ॥१॥ चंद्रभागा तीरीं शोभे पुंडलीक । संत अलोकिक गर्जताती ॥२॥ भाळे भोळे जन गाती तेंसाबडें । विठ्ठला आवदे प्रेम त्यांचे ॥३॥ नारीनर मिलाले आनंदें गजर । होत जयजयकार महाद्वारी ॥४॥ एका जनार्दनीं प्रेमळ ते जन । करिती भजन विठोबाचें ॥५॥