भजनी मालिका
← भजनांकडे परत

आनंद सर्वांचा काला अरुवार

anand sarvancha kala aruvar

आनंद सर्वांचा काला अरुवार । नामया साचार फुंदतसे ॥ १ ॥ राहिरखुमाई सत्यभामा माता । आलिया त्वरिता काल्यामाजी ॥ २ ॥ उचलिला नामा प्रेमाचें फुंदन । नुघडी तो नयन कांही केल्या ॥ ३ ॥ बुझावित राही रखुमादेवी बाही । पीतांबर साई करू हरी ॥ ४ ॥ ज्ञानासी कवळु सोपानासी वरु । खेचरा अरुवारु कवळु देत ॥ ५ ॥ निवृत्ति पूर्णिमा भक्तीचा महिमा । नामयासि सीमा भीमातीरीं ॥ ६ ॥