भजनी मालिका

भजने

आदि मग हे अनादि बोली । निशीनें प्रगटलीं सूर्यमहिमा ॥१॥ अर्थ याचा आणा चिता । मग विचारितां कळेल ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

आदि मध्य अंत दाखविला दीपें । हा तों आपणापें यत्न बरा ॥१॥ दास्यत्वे दाविलें धन्याचें भांडार । तोंतों नव्हे सार एथुनियां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आदि मध्य अंत न कळे कोणासी । तो हृषीकेशी पंढरीये ॥१॥ जया वेवादती साही दरुशनें । न कळे म्हणोन स्तब्ध जाहलीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आदि वर्तमान जाणसी भविष्य । मागें पुढें नीस संचिताचा ॥१॥ आतां काय देऊं पायांपें परिहार । जाणां तो विचार करा देवा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आदिनाथ शंकरे केला उपकार । ठेवणें निर्धार प्रगट केलें ॥१॥ तोचि महाराज निवृत्ति अवतार । केला उपकार जगालागीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आंधळिया उगवोनी रवी । न दिसेचि तेंवि मज झालें ॥१॥ तेंवी तुम्ही स्वत:सिध्द हरी । परि मी माझारी भ्रांतीतमा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

आंधळ्यानें स्वंरूप देखियलें नयनीं । मुकें बहिर्‍या कानीं गोष्टी सांगे ॥१॥ कांसवीचें दूध दुहितां भरणा । दुही त्याला जाणा हात नाहीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव