भजनी मालिका
← भजनांकडे परत

आनंद झाला अयोध्येसी आले रघुनाथ । अवघा जयजयकार आळंगिला भरत

anand jhala ayodhyesi ale raghunath | avagha jayajayakar alangila bharat

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आनंद झाला अयोध्येसी आले रघुनाथ । अवघा जयजयकार आळंगिला भरत ॥१॥ आनंदले लोक नरनारी परिवार । शंखभेरीतुरें वाद्यांचे गजर ॥ध्रु.॥ करिती अक्षवाणें ओंवाळिती रघुवीरा । लक्ष्मीसहित लक्ष्मण दुसरा ॥२॥ झालें रामराज्य आनंदलीं सकळें । तुका म्हणे गाईवत्सें नरनारीबाळें ॥३॥