भजनी मालिका
← भजनांकडे परत

आनंद समाधि संत भक्त देव । करिती उत्साह संवत्सरीं

anand samadhi sant bhakta dev | kariti utsah sanvatsarin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आनंद समाधि संत भक्त देव । करिती उत्साह संवत्सरीं ॥१॥ गरुड हनुमंत भक्त ते मिळाले । जयजयकार केलें सुरवरीं ॥२॥ पुष्पांचा वर्षाव विमानांची दाटी । सोपानदेवा भेटी येती देव ॥३॥ तो सुखसोहळा वर्णावया पार । नोहेचि निर्धार माझी मती ॥४॥ एका जनार्दनीं सोपानाचरणीं । मस्तक ठेवूनि निवांत राहीन ॥५॥