भजनी मालिका
← भजनांकडे परत

आधींच तू ज्ञान वरी जालें

adhinch tu dnyan vari jalen

आधींच तू ज्ञान वरी जालें । उन्मन हरि हें जीवन ह्रदयीं आलें ॥१॥ स्थिरावलें ध्यान ज्ञानाचीये वृत्ति । विज्ञानसंपत्ति साधलिया ॥२॥ अंधकारपट नासला समतेज । रामरुपी पैज दीपज्ञान ॥३॥ संत शांतशांति उलथिचा ठसा । कृष्णरुपीं दिशा तेजो तेज ॥४॥ अलक्ष लक्षिते अगोचर पर । तेथेंही गव्हर संचलें ॥५॥ ज्ञानदेव सुखी जालीसे विश्रांति । परमानंद चित्तीं निरंतर ॥६॥