भजनी मालिका
← भजनांकडे परत

आन साधनें सायास । कांहीं न करीं आयास नामाचाचि उल्हास । ह्रदयीं वास असावा

an sadhanen sayas | kanhin na karin ayas namachachi ulhas | hradayin vas asava

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
आन साधनें सायास । कांहीं न करीं आयास नामाचाचि उल्हास । ह्रदयीं वास असावा ॥१॥ हेचि मागतसे देवा । हीच माझी भोळी सेवा । पायांसी केशवा । हाचि हेवा मानसीं ॥२॥ जन्म देई संताघरीं । उच्छिष्टाचा अधिकारी । आणिक दुजी थोरी । दारीं परवरी लोळेन ॥३॥ नका मोकलूं दातारा । विनंती माझी अवधारा । अहो रुक्मादेवीवरा । आवरा पसारा चोखा म्हणे ॥४॥