भजनी मालिका

भजने

वांकडे पाहणें जया लौकिकासी । मज पंढरिसी वास पुरे ॥१॥ उदंड उपास कासया करावे । पुरे एका भावें भाविकांसी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वाघाचा कलभूत दिसे वाघाऐसा । परी नाहीं दशा साच अंगीं ॥१॥ बाहेरील रंग निवडी कसोटी । संघष्टणें भेटी आपेआप ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

वाघाचिये गव्हाणीं बांधिलीसे गाये । कैसी तुं वो माये लोभाचारें ॥१॥ कां मज संसारीं घालितोसि देवा । कैसी तुझी माया जीवा गोड वाटे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वाघें उपदेशिला कोल्हा । सुखें खाऊं द्यावें मला॥१॥ अंतीं मरसी तें न चुके । मज ही मारितोसी भुके ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

वाचा नामसंकीर्तनीं । मानस तुमच्या निश्चयें ध्यानी । नेत्र हे तुमच्या अवलोकनीं । चालावें चरणीं तीर्थयात्रे ॥१॥ करीं करावें तुमचें पूजन । श्रवणीं करावें गुणांचे श्रवण । चित्तें सदां तुमचें चिंतन । घ्राणी अवघ्राण निर्माल्य तुळसी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

वाचा वेधलां हरिकीर्तनीं । श्रवण श्रवणीं गोडावले ॥१॥ नेत्रीं बैसलें हरीचें रुप । पूजनीं पडप उभय करां ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

वाचाचापल्ये बहु जालों कुशळ । नाहीं बीजमूळ हाता आलें ॥१॥ म्हणोनि पंढरिराया दुखी होतें मन । अंतरींचे कोण जाणे माझें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

वाचाळ लटिके अभक्त जे खळ । आपुलें तें बळ वाखानावे ॥१॥ बळें हुंबरती सत्य त्यां न कळे । नुघडती डोळे अंधळ्यांचे ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

वाचितां अध्यात्म जाणितांही अर्थ । गुरुवीण व्यर्थ सर्व कांहीं ॥१॥ करावा तो आधीं सद्‌गुरु प्रसन्न । त्याचिये कृपेनें सर्व साधे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वाचे उच्चारी जो ज्ञानदेवाशी । तयाच्या सुकृतासी नाहीं पार ॥१॥ पूर्वीचे सुकृत फळासि आलें। वाचें उच्चारिलें ज्ञानदेवा ॥२॥

रचनाकार: संत सेना

वाचे नाम गात चालिला तो द्विज । एकाचें तें चोज शुद्ध भावें ॥१॥ जीवशिव एकाकार झाली वृत्ति । नाहीं कांहीं चित्तीं शमदम ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वाचे म्हणा रामनाम । तेणें निवारे क्रोध काम । संसाराचा श्रम । नुरे कांहीं तिळमात्र ॥१॥ न लगे वेदविधि आचार । सोपा मंत्राचा उच्चार । अबद्ध अथवा शुचि साचार । राम म्हणा सादर ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ