भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाघाचा कलभूत दिसे वाघाऐसा । परी नाहीं दशा साच अंगीं

vaghacha kalabhut dise vaghaaisa | pari nahin dasha sach angin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वाघाचा कलभूत दिसे वाघाऐसा । परी नाहीं दशा साच अंगीं ॥१॥ बाहेरील रंग निवडी कसोटी । संघष्टणें भेटी आपेआप ॥ध्रु.॥ सिकविलें तैसें नाचावें माकडें । न चले त्यापुढें युक्ति कांहीं ॥२॥ तुका म्हणे करी लटिक्याचा सांटा । फजित तो खोटा शीघ्र होय ॥३॥