भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाचाचापल्ये बहु जालों कुशळ । नाहीं बीजमूळ हाता आलें

vachachapalye bahu jalon kushal | nahin bijamul hata alen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वाचाचापल्ये बहु जालों कुशळ । नाहीं बीजमूळ हाता आलें ॥१॥ म्हणोनि पंढरिराया दुखी होतें मन । अंतरींचे कोण जाणे माझें ॥ध्रु.॥ पूज्य जालों अंगा आला अभिमान । पुढील कारण खोळंबलें ॥२॥ तुका म्हणे खूण न कळे चि निरुती । सांपडलों हातीं अहंकाराचे ॥३॥