भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाचाळ लटिके अभक्त जे खळ । आपुलें तें बळ वाखानावे

vachal latike abhakta je khal | apulen ten bal vakhanave

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वाचाळ लटिके अभक्त जे खळ । आपुलें तें बळ वाखानावे ॥१॥ बळें हुंबरती सत्य त्यां न कळे । नुघडती डोळे अंधळ्यांचे ॥२॥ आसुडिल्या माना हात पाय नेटें । तंव भार बोटें उचलिला ॥३॥ लटिका चि आम्हीं सीण केला देवा । कळों आलें तेव्हां सकळांसि ॥४॥ आलें कळों तुका म्हणे अनुभवें । मग अहंभावें सांडवलीं ॥५॥