भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाघाचिये गव्हाणीं बांधिलीसे गाये । कैसी तुं वो माये लोभाचारें

vaghachiye gavhanin bandhilise gaye | kaisi tun vo maye lobhacharen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
वाघाचिये गव्हाणीं बांधिलीसे गाये । कैसी तुं वो माये लोभाचारें ॥१॥ कां मज संसारीं घालितोसि देवा । कैसी तुझी माया जीवा गोड वाटे ॥२॥ विषयाचें गरळ पाजिसी केवळ । ह्रदया कोवळें कैसें तुझें ॥३॥ नामा म्हणे मज आदिअंतीं एकु । जननी आणि जनकु पांडुरंग ॥४॥