भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाचे बोला दत्त दत्त । होय सकळ परमार्थ

vache bola datta datta | hoy sakal paramartha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वाचे बोला दत्त दत्त । होय सकळ परमार्थ ॥१॥ दत्तरुपीं लागतां दृष्टी । दत्तरुप अवघी सृष्टी ॥२॥ दत्तकथा वसे कानी । दत्तमुर्ति ध्यानीं मनीं ॥३॥ दत्तालागीं आलिंगना । कर समर्थ हें जाणा ॥४॥ एका जनार्दनीं दत्त । सदा वसे हृदयांत ॥५॥